सचिन आहे एवढ्या टीमचा मालक…

२४ वर्ष क्रिकेटच मैदान गाजवलेला भारताचा महान क्रिकेटर निवृत्तीनंतरही विविध खेळांशी निगडित आहे. अगदी बॅडमिंटन पासून ते कुस्ती पर्यंत सचिन वेगेवेगळ्या खेळांच्या लीगमधील टीमचा मालक असून तो ते खेळ मोठे होण्यासाठी प्रयत्नही करत असतो. कालच सचिन प्रो- कबड्डी लीगमधील चेन्नई टीमचा सहमालक बनला.

सचिन वेगवेगळ्या खेळांच्या लीगमधील टीमशी कसा निगडित आहे ते पाहूया!

 

#१ सचिन आणि मुंबई इंडियन्स

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २००८ सालापासून मुंबईच्या संघांचा अविभाज्य भाग आहे. त्याने या संघाचं नेतृत्वही केलं आहे. २०१३ साली सचिनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. परंतु तरीही तो या संघांशी वेगळ्या नात्याने जोडला गेला. तो २०१४ च्या मोसमापासून मुंबई इंडियन्स संघांशी मेंटॉर म्हणून जोडला गेला. सचिनचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला उपयोगी पडते असे मुंबई इंडियन्स मधील नवोदित खेळाडू नेहमी म्हणतात.

 

#२ सचिन आणि केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब

 

२०१४ साली इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली. या सचिनने केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचा सहमालक झाला. विशेष म्हणजे सचिन ह्या संघाबरोबर कायमच उपस्थित असतो. पिवळ्या रंगाची जर्सी घालून सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन नेहमीच आपल्या या फुटबॉल क्लबला पाठिंबा देत असतो. सचिनचा हा संघ २०१४ आणि २०१६ चा उपविजेता आहे.

#३ सचिन आणि बेंगळुरू ब्लास्टर्स

प्रीमियर बॅडमिंटन लीगची सुरुवात २०१३ साली झाली. सुरुवातीच्या ३ मोसमात सचिन कोणत्याही संघाचा मालक नव्हता. परंतु सॅन २०१६ मध्ये मास्टर ब्लास्टरने बांगा बिट्स या संघाची खरेदी करून त्याचा सहमालक झाला. पुढे याच संघाला बेंगळुरू ब्लास्टर्स असे नाव दिले.

#४ सचिन आणि चेन्नई (प्रो कबड्डी टीम )

देशात प्रसिद्धीमध्ये आयपीएललाही मागे टाकलेली एकमेव लीग म्हणजे प्रो कबड्डी लीग. या लीगचा मोठा चाहता वर्ग आहे. अश्या या लीगच्या ५व्या मोसमात ४ संघांची भर घालण्यात आली. त्यात चेन्नई संघांचा सचिन हा सहमालक आहे.