२०१९ विश्वचषकात हे संघ गाठतील उपांत्य फेरी, सचिन तेंडुलकरने वर्तवला अंदाज

विश्वचषक 2019 साठी आता केवळ एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. 30 मेपासून या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकासाठी सर्व सहभागी संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. या विश्वचषकाबद्दल अनेक दिग्गजांनी विविध अंदाज वर्तवले आहेत.

यामध्ये आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोणते चार संघ प्रवेश करतील याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत प्रवेश करु शकतील. तसेच चौथा संघ न्यूझीलंड किंवा पाकिस्तानपैकी एक असू शकतो.’

या विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी 24 मे ते 28 मे या कालावधीत सराव सामने होणार आहेत. या कालावधीत सर्व सहभागी संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना 25 मे ला न्यूझीलंड विरुद्ध तर दुसरा सराव सामना 28 मे ला बांगलादेश विरुद्ध होणार आहे.

त्यानंतर 30 मेपासून विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकातही हवी आयपीएल प्लेऑफसारखी पद्धत – रवी शास्त्री

विश्वचषकाआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला दिला खास सल्ला…

काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, पहा व्हिडिओ