अंतिम सामन्यानंतर सचिन तेंडुलकर केन विलियम्सनला असे म्हणाला…

रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर पार पडला.शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांच्या आधारावर इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली आणि पहिल्यांदाच विश्वविजेतेपद मिळवले.

या सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला या विश्वचषकातील मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याला हा पुरस्कार भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या हस्ते देण्यात आला.

सचिनने या सामन्यानंतर विलियम्सनला काय सांगितले याचा खूलासा नुकताच 100mb ऍपवर बोलताना केला आहे. सचिनने विलियम्सनला सामन्यानंतर सांगितले की ‘तूमच्या खेळाचे सर्वांनी कौतुक केले आहे आणि तूमच्यासाठी हा विश्वचषक शानदार होता.’

विलियम्सनने या विश्वचषकात 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

विलियम्सनचे कौतुक करताना सचिन म्हणाला, ‘विलियम्सनची सर्वात चांगली क्षमता ही शांत राहणे ही आहे. तो कधीही कोणत्याची परिस्थितीत त्याची शांत मनस्थितीवरील ताबा गमावत नाही. तो विश्वचषक जिंकू शकला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण त्याच्या चेहऱ्यावर त्याचे दु:ख दिसले नाही.’

याबरोबरच सचिनने विलियम्सनच्या नेतृत्वाच्या शैलीचेही कौतुक केले आहे. सचिन म्हणाला, ‘विलियम्सन विविध दृष्टीकोनातून खेळाकडे पाहू शकतो. कमी धावांचा बचाव करत असताना त्याचे मैदानावरील बदल, तसेच गोलंदाजांमधील बदल करणे हे प्रशंसनीय आहे. अगदी भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात जेव्हा रविंद्र जडेजा मोठे फटके मारत होता, तरी तो शांत होता. शेवटी त्या सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने लागला.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हे तीन दिग्गज निवडणार टीम इंडियासाठी नवीन कोच?

विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मनिष पांडे, कृणाल पंड्याची चमकदार कामगिरी

विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या या क्रिकेटपटूच्या भावाची झाली हत्या, तरीही तो खेळत होता संघासाठी