खासदार निधीतून सचिनने मुंबईतील रेल्वेपुलाच्या कामासाठी दिला निधी !

भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपल्या खासदार निधीतून स्थानिक क्षेत्रासाठी २ करोड रुपये मंजूर केले आहे. त्याने हे पैसे मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वेपूल दुरुस्तीसाठी मंजूर करून घेतले आहे.

नुकताच २९ सप्टेंबर मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जण मृत्युमुखी पडले होते. याचमुळे सचिनने रेल्वेपुल त्वरित सुधारणेसाठी निधी मंजूर केला आहे. त्याने सांगितले आहे की वेस्टर्न रेल्वे आणि सेंटर रेल्वेला प्रत्येकी १ करोड देण्यात यावे.

सचिनने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून याबद्दल कळवले आहे. त्याने पत्रात लिहिले आहे की, नुकत्याच परळला झालेल्या अपघात बघून मुंबईकरांची त्याला मदत करायची आहे. पुन्हा असे न होण्यासाठी आपण प्रयन्त केले पाहिजे.

हे पत्र मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट कलेक्टरलाही दिले आहे. त्याचबरोबर सचिन म्हणाला, तो रेल्वे मंत्रालयाशी, रेल्वे बोर्ड्शी आणि विभागीय प्रमुखांशी देखील या विषयी बोलला आहे.