काय सांगता! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झोपेत चालायचा!

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला झोपेत चालण्याची सवय आहे. याबद्दल खुद्द सचिननेच त्याचा संघसहकारी आणि भारताचा महान कर्णधार सौरव गांगुलीला सांगितले होते.

याबद्दलची ही आठवण गांगुलीने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या चॅट शोमध्ये सांगितली आहे. गांगुली म्हणाला, “माझ्या भारतीय संघातील सुरुवातीच्या दिवसात आम्ही इंग्लंड दौऱ्यावर होतो. त्यावेळी सचिन माझा रुममेट होता.

“यावेळी मी त्याला एका रात्री रुममध्ये चालताना पाहिले. तेव्हा मला वाटले की कदाचीत तो वॉशरुमला जाऊन आला असेल. त्यामुळे मी झोपलो आणि याबद्दल त्याला दुसऱ्या दिवशी काही विचारले नाही.”

“पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच घडले. तो रुममध्ये गोल-गोल फिरुन खुर्चीवर बसायचा आणि नंतर बाजूला येऊन झोपायचा. त्यावेळी मी त्याला म्हटलो की रात्री तू काय करतो असे करुन तू मला घाबरवत आहेस. पण यावर उत्तर देताना सचिनने सांगितले की त्याला झोपेत चालण्याची सवय आहे.”

याबरोबरच गांगुलीने सचिनबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. हे दोघेही 14 वर्षांचे असल्यापासून मित्र असल्याचेही गांगुलीने या शोमध्ये सांगितले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन-कांबळी जोडीची करामत, गांगुलीच्या रुममध्ये झाले पाणीच पाणी…

बापरे! विराटबरोबर ५७ धावांची भागीदारी करणाऱ्या फलंदाजाने केली केवळ १ धाव

विराट वादळात फारसा लक्षात न आलेला अश्निनचा हा कारनामा पहाच