मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीचे नवे पर्व

मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी स्फोटक फलंदाज विनोद कांबळी यांच्यातील कटुता कमी होऊन मैत्रीचे नवे पर्व सुरु झाले आहे.

सचिन-कांबळी हे बालपणापासूनचे मित्र असून मधल्या काही काळात हे मित्र दुरावले होते. परंतु आता ते पुन्हा एकत्र आले आहे.

विनोद कांबळीने कालने काल आपला ४६वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा सचिन तेंडुलकर आणि कांबळीचे जुने मित्रही उपस्थित होते. याचा खास विडिओ त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यावेळी अजय देसाई आणि अतुल रानडे हेही होते.

विनोद कांबळी भारताकडून १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळला आहे.

काल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कांबळीला फेसबुक, ट्विटर तसेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.

आजचा क्षण हा माझ्या २०१८वर्षातील सर्वोत्तम असल्याचे कांबळीने म्हटले आहे.