सचिन आणि शेकडो भारतीयांनी केले आयएनएस तरकशचे लंडनमध्ये स्वागत…!!!

शेकडो ब्रिटनस्थित भारतीय आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज लंडनच्या थेम्स नदीवर डोयाकार्ड भारतीय आयएनएस तरकश नौकेचे स्वागत केले.
सचिनला काल रात्री ७व्या वार्षिक आशियायी फेल्लोवशीप अवॉर्डने लंडन सन्मानित केले गेले.

आयएनएस तरकश सध्या लंडनमध्ये नौदलाच्या सरावासाठी आणि ब्रिटन आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक वर्ष २०१७ च्या मुहूर्तावर गेली आहे.
ही युद्धनौकने कॅप्टन रितुराज साहू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात मुंबई येथून प्रस्थान केले व आज तिचे लंडन येथे आगमन झाले. पुढील एक आठवडा येथे भारतीय नौदलाच्या सरावात ही नौका सहभागी होणार आहे.

 

” असा पहिल्यांदाच होतंय कि भारतीय स्टेल फ्रीगनेट लंडन मध्ये आली. लंडनस्थित भारतीय नागरिकांनी ह्या अनोख्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा.” असे भारतीय लंडन दूतावासाचे उप- उच्चआयुक्त दिनेश पटनाईक म्हणाले.