जेव्हा सईद अजमल करतो संगकाराचा ट्विट कॉपी-पेस्ट

पाकिस्तान संघाने यजमान इंग्लंड संघावर विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. स्पर्धेची अतिशय खराब सुरुवात केलेल्या आणि आयसीसी क्रमवारीत तळातील संघ असलेल्या पाकिस्तानच्या या जबदस्त कामगिरीवर जगातील दिग्गज माजी खेळाडूंनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या.

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज कुमार संगकाराही यात मागे नव्हता. त्याने १४ तारखेला ९ वाजून ५६ मिनिटांनी पाकिस्तानी संघाला ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. संगकारा त्यात म्हणतो, ” पाकिस्तानी संघाचा एक चांगला विजय. पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव होऊनही आज ते दिग्गज इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत पोहचले.”


यांनतर काही वेळानेच हाच ट्विट १५-२० मिनिटांनी पाकिस्तानचा बंदी घातलेला गोलंदाज सईद अजमलने हाच ट्विट कॉपी-पेस्ट करून प्रसिद्ध केला. यावर मोठ्या प्रमाणावर या खेळाडूला ट्विपलने ट्रॉल केले.


त्यात एका यूजरने म्हटले, “इंग्लिश नहीं आना शर्म की बात नहीं हैं…शर्म की बात यह है कि हमें अपनी जुबान में बोलने में शर्म आती है.”


तर एक ट्विट असाही होता, ” सईद अजमल भाई टीम को बधाई देने के लिए तो कम से कम कॉपी पेस्ट ट्वीट मत करो.”

पाकिस्तान अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताशी दोन हात करेल.