सामना जिंकणं नंबर एक असण्यापेक्षा जास्त आनंद देतं.

साईना काही महिन्यापूर्वी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या साईना नेहवालने तिच्यासाठी स्पर्धा जिंकणे हे जागतिक क्रमवारीत परत पहिला क्रमांक मिळविण्यापेक्षा जास्त महत्वाचं असल्याचं बोललं आहे. सध्या इंडिया ओपनमध्ये खेळत असलेली साईना म्हणाली कि, “मी याआधी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होते. मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही. स्पर्धा जिंकून माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.”

जेव्हा मी जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानी होते तेव्हा मी ह्याच क्रमवारीत प्रथम स्थानी असणाऱ्या तै ताझुला हरवून स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे स्पर्धा जिंकण हे माझ्यासाठी कायमच आनंद देणार असतं. मी सध्या दुखापतीमधून बाहेर आली असून हा माझ्यासाठी कठीण काळ आहे. मी काहीतरी ध्येय घेऊन सध्या खेळात आहे. आणि ती साध्य करण्यासाठी मी अथक प्रयत्न करत आहे. साईना सध्या इंडिया ओपनच्या दुसऱ्या फेरीत पोहचली असून तिचा सामना आता पोर्नपावी चॉचुवोन्गशी होणार आहे.