सायनाने विजेतेपदाचे श्रेय दिले कोच पी. गोपीचंदला !

नागपूर । परवा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्याच पीव्ही सिंधूला पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. या अजिंक्यपदाचे सर्व श्रेय तिने कोच पी. गोपीचंद यांना दिले आहे.

सामन्यानंतर बोलताना ती म्हणाली, ” मी गोपीचंद सरांचे आभार मानते की त्यांनी मला माझा खेळ सुधारण्यासाठी मदत केली तसेच माझ्या टीमचेही मी आभार मानते ज्यांनी यासाठी खूप कष्ट घेतले आहे. त्यांनी या विजयात खूप महत्वाची भूमिका पार पडली आहे. “

या स्पर्धेवेळी आणि विशेष करून अंतिम सामन्यावेळी स्टेडियम हॉऊसफूल होते. यावर बोलताना ती म्हणाली,”मी नागपूरच्या सर्व चाहत्यांची आभारी आहे जे वेळ काढून हा सामना आणि स्पर्धा पाहायला आले. या स्पर्धेतून युवा खेळाडूंना खूप शिकायला मिळेल. “