३ वर्षांनी गोपीचंद पुन्हा होणार साईनाचे प्रशिक्षक

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू साईना नेहवालने आपल्या भूतपूर्व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. साईना नेहवाल पुन्हा गोपीचंद अकॅडमीमधील खेळाडू होणार आहे. साईनाने याबाबत खुलासा करणारे ट्विट ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

१९८० च्या दशकात महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी गोपीचंद यांच्या खेळतील गुण हेरले आणि त्यांना प्रशिक्षण दिले. प्रकाश पादुकोण यांच्यासोबत प्रशिक्षण घेताना गोपीचंदने २००१ साली ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. निवृत्तीनंतर गोपीचंद यांनी २००८ साली स्वतःची अकॅडमी सुरु केली.

त्यांच्या अकॅडमीमधूनच साईना नेहवाल नावारूपाला आली. बॅडमिंटनमधील चायनीज खेळाडूंची मक्तेदारी मोडत साईनाने २२ जून २००९ साली इंडोनेशिया सुपर सिरीज जिंकली. त्यावेळी तिच्या नावाची चर्चा होत ‘इट्स साईना, नॉट चायना’ असे वातावरण तयार झाले. त्यानंतर २०१२ लंडन ऑलम्पिक स्पर्धेत साईनाने कांस्यपदक मिळवले. या कामगिरीत प्रशिक्षक गोपीचंद यांचा सिंहाचा वाट होता.

जर तुम्हाला हे माहित नसेल तर-

# साईनाने सोडली होती गोपचंद यांची अकॅडमी
चायनीज खेळाडू ली जुरई आणि अन्य काही चायनीज खेळाडूंविरुद्ध होणाऱ्या सलग पराभव आणि कामगिरी उंचावत नसल्याचे कारण देत तिने गोपीचंद यांच्या अकॅडमीमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने विमल कुमार यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. विमल कुमार यांच्या प्रशिक्षणात ती जागतीक मानांकनात पहिल्या क्रमांकावर पोहचली होती.

# विमल कुमारांसाठी दिला खास संदेश- ” मागील तीन वर्षात मला मदत केल्यामुळे मी विमल सर यांची खूप आभारी आहे. त्यांनी मला जागतिक मानांकन यादीत पहिल्या क्रमांकावर येण्यास खूप मदत केली. त्याच बरोबर अनेक सुपर सिरीज आणि बॅडमिंटन चॅम्पियनशीप २०१५ मध्ये रौप्यपदक आणि २०१७ मध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी मदत केली.”