सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद

इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनला पायाची दुखापत झाल्याने भारताच्या सायना नेहवालने विजेतेपद पटकावले आहे. यामुळे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये कॅरोलिना 9-3 अशी भक्कम आघाडीवर होती. यावेळी उजव्या पायाला दुखापत झाल्याने तीने या सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे सायनाला विजेती घोषित करण्यात आले.

याआधी या दोघींनाही या स्पर्धेचे विजेतेपद एकदाही जिंकता आले नव्हते. यामुळे दोघींनीही उत्तम सुरूवात केली होती. पहिल्याच गेमपासून कॅरोलिनाने तिचे वर्चस्व कायम ठेवत 10-4 अशी मोठी आघाडी घेतली होती.

आतापर्यंत सायना आणि कॅरोलिना या दोघी 12 वेळा एकमेंकाविरुद्ध खेळल्या असून दोघींच्याही खात्यात 6-6 असे समान विजय आहेत.

सायनाने जवळजवळ दोन वर्षांने बीडब्ल्यूएफचे विजेतेपद मिळवले आहे. तिने याआधीचे बीडब्ल्यूएफ विजेतेपद मलेशियामध्ये 2017 ला मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीने म्हणतो, विश्वचषक जिंकण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट करावी लागेल

शून्यावर बाद झाल्यानंतर ६८ वर्षीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

असे झाले काय की न्यूझीलंड पोलिसांनी टीम इंडियापासून न्यूझीलंडच्या नागरिकांना केले सावध