साईना नेहवाल आणि पि व्ही सिंधू येणार आमने-सामने ..!!

सध्या सुरु असलेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य-पूर्व सामन्यात भारताच्या साईना आणि सिंधू एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत. यापूर्वी साईना आणि सिंधू २०१४ साली आमने-सामने आल्या होत्या व साईनाने सिंधूला सरळ सेट मध्ये हरवले होते. त्यावेळी साईना क्रमवारीत अव्वल स्थानी होती व १८ वर्षीय सिंधू नुकतेच आपले पदार्पण करत होती.

३ वर्षांनंतरचे चित्र मात्र बरेच बदलले आहे. आज घडीला सिंधू ही साईनाच्या पेक्षा उजवी आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. गेली २ वर्ष सात्यत्याने उत्तम कामगिरी करत सिंधूने आपले नाव बॅडमिंटन क्षेत्रात उच्च स्थानी नेऊन ठेवले आहे. सध्या सिंधू क्रमवारीत ५ व्या स्थानी आहे तर साईना ही ८ व्या स्थानी आहे. २०१६ च्या रियो ऑलिंपिकच्या रौप्य पदकानानंतर सिंधूकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे निश्चित. ऑलिम्पिक विश्वविजेती कॅरोलिना मरीन देखील उपांत्य-पूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. आता या सर्वांमध्ये अंतिम सामना कोणाच्यात रंगतो ते पाहावे लागेल.