सिंधू, सायनाबरोबरच श्रीकांत, प्रणॉय जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र

दिल्ली। भारताच्या अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल ह्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांच्याबरोबरच किदंबी श्रीकांत, एच एस प्रणॉय आणि बी साई प्रनीथ या भारतीय पुरूष खेळाडूंनीही या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला आहे.

हि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा चीनमधील नानजिंग येथे 30 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.

ग्लासगो येथे झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेत सिंधूने रौप्य तर सायनाने कांस्यपदक मिळवले होते.

पुरूष दुहेरीसाठी राष्ट्रकूल स्पर्धेतील रौप्यपदक विजेते सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीसह मनू अत्री आणि सुमित रेड्डी ही जोडीही पात्र ठरली आहे.

अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी हि जोडी महिला दुहेरीसाठी पात्र ठरली आहे. ह्या दोघींने राष्ट्रकूल स्पर्धेतील  महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले होते.

महिला दुहेरीसाठीची दुसरी जोडी पूर्विशा एस राम आणि जे मेघना या दोघी पात्र ठरल्या आहेत. सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा हे मिश्र दुहेरीसाठी पात्र ठरले आहेत.