वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच

चीन येथे सोमवार 30 जुलैला सुरु झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे.

आज (31 जुलै) एकेरीत सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी, मिश्र दुहेरीत स्वस्तिकराज रांकारेड्डी-अश्विनी पोनप्पा आणि पुरुष दुहेरीत स्वस्तिकराज रांकारेड्डी-चिराग शेट्टी या खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. 

सायना आणि श्रीकांतला आज जास्त संघर्ष करावा लागला नाही. सायनाने पहिल्या फेरीत तुर्कीच्या अलिये डेमिरबॅगचा 38 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-17,21-8 असा सरळसेटमध्ये पराभव केला.

तसेच श्रीकांतने आयर्लंडच्या न्हाट नग्वायेनचा 37 मिनिटांच्या लढतीत 21-15,21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

याबरोबरच पुरुष दुहेरीत स्वस्तिकराज-चिराग या जोडीने डेन्मार्कच्या मार्कस एलिस- ख्रिस लँग्रिज यांचा 21-19, 12-21, 21-19 असा पराभव केला तसेच महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डीने तैवानच्या चायंग काई सीन-हंंग शिह हान या जोडीला 19-21, 21-10,21-17 असे पराभूत केले.

याबरोबरच मिश्र दुहेरीत स्वस्तिकराज – पोनप्पा या जोडीसमोर जर्मनच्या मार्क लम्सफस-इसाबेल हर्टट्रिचचा टीकाव लागला नाही. म्सफस-इसाबेल यांना स्वस्तिकराज – पोनप्पा या भारताच्या जोडी समोर 10-21, 21-17, 21-18 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. 

त्याचबरोबर आज पुरुष दुहेरी भारताच्या कोना तरुण – सौरभ शर्मा या जोडीला, महिला दुहेरीत मेघना – पूर्विशा या जोडीला तर मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा – सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर – कुहू गर्ग या जोड्यांना पराभव पत्कारावा लागला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत

आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये