ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकच्या अंतिम सामन्याला १०० प्रेक्षकही उपस्थित नव्हते..

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकच्या दिल्ली येथे झालेल्या सामन्याला जेमतेम १०० प्रेक्षकांनी हजेरी लावली. यामुळे सोशल मीडियावर काही क्रीडाप्रेमींकडून जोरदार टीका करण्यात आली.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने काल येथे सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची कमी केली. एकतर्फी झालेल्या सामन्यात रिओ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती जपानची रिसाको कवाई विरुद्ध साक्षीचा पराभव झाला. त्यामुळे तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.

ज्या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट बनवून चित्रपट निर्माते शेकडो करोडो रुपये कमावतात त्याच खेळाडूंच्या एवढ्या मोठ्या सामन्याला साधे १०० प्रेक्षक न येणे हि क्रीडाक्षेत्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू जोरदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेत रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी रौप्य पदक जिंकले आहे.