२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम

भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या 12व्या हंगामाचे सर्वांना वेध लागले आहेत. या हंगामासाठी आठही संघांनी संघबांधणीची तयारी केली आहे. प्रत्येक संघानी 15 नोव्हेंबरला संघातून मुक्त केलेल्या आणि संघात कायम ठवलेल्या खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे.

यामध्ये तीन वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सच्या संघात 2019 च्या आयपीएलमध्ये काही महत्त्वाचे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी 10 खेळाडूंना मुक्त केले आहे.

तसेच त्यांनी संघात एकूण 17 खेळाडू कायम केले आहेत. यात 6 परदेशी खेळाडू आहेत. तर त्यांनी क्विंटॉन डीकॉकला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेरेदी केले आहे. त्यामुळे त्यांच्या संघात सध्या 18 खेळाडू आहेत.

यामुळे त्यांच्या संघात 2019 च्या आयपीएलसाठी 6 भारतीय खेळाडूंची तर 1 परदेशी खेळाडूची जागा शिल्लक आहे.

मुक्त केलेल्या 10 खेळाडूंमध्ये जेपी ड्यूमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान आणि अकिला धनंजया हे 4 परदेशी खेळाडू आहेत. तसेच त्यांनी एकूण तर 6 भारतीय खेळाडूंना मुक्त केले आहे.

मुंबईने कायम केलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक रक्कम ही कर्णधार रोहित शर्माला मिळणार आहे. त्याला 15 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच पंड्या बंधूंपैकी हार्दिकला 11 कोटी रुपये तर कृणालला 8.8 कोटी रुपये मिळणार आहेत.

तसेच सर्वात कमी रक्कम ही आदित्य तरे, अनुकुल रॉय, मयंक मार्कंडे, सिद्धेश लाड यांना मिळणार आहे. यांना प्रत्येकी 20 लाख रुपये मिळतील.

संघात कायम केलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना 2019 च्या आयपीएलसाठी मिळणारी रक्कम-

रोहित शर्मा – 15 कोटी

हार्दिक पंड्या – 11 कोटी

जसप्रीत बुमराह – 7 कोटी

कृणाल पंड्या – 8.8 कोटी

इशान किश – 6.2 कोटी

सूर्यकुमार यादव – 3.2 कोटी

मयंक मार्कंड – 20 लाख

राहुल चहर – 1.9 कोटी

अनुकुल रॉय – 20 लाख

सिद्धेश लाड – 20 लाख

आदित्य तारे – 20 लाख

क्विंटन डीकॉक – 2.8 कोटी

एव्हिन लेविस – 3.8 कोटी

किरॉन पोलार्ड – 5,4 कोटी

बेन कटिंग – 2.2 कोटी

मिशेल मॅक्लेनाघन – 1 कोटी

अॅडम मिलने – 75 लाख

जेसन बेरेन्डॉन्फ – 1 कोटी

महत्त्वाच्या बातम्या:

पुढील महिन्यात होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी झाली टीम इंडियाची घोषणा

मिताली राजला टीम इंडियातून वगळण्याचे रमेश पोवार यांनी दिले स्पष्टीकरण

आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय गोलंदाजाने घेतली किंग कोहलीची विकेट