भारताविरुद्ध कसोटीत चमकदार कामगिरी करणाऱ्या सॅम करनचा मोठा सन्मान

पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या सॅम करनला क्रिकेट रायटर्स क्लबचा ‘क्लब यंग क्रिकेटर आॅफ द ईयर 2018 या पुस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्याचा कांऊटीतील सहकारी राॅरी बर्न्स याला कांऊटी चाम्पियनशीप प्लेयर आॅफ द ईअर सन्मानीत करण्यात आले आहे.

भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत सॅम करनला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. 5 कसोटी सामने खेळलेल्या करनची फंलदाजीतील सरासरी 36.50 तर गोलंदाजीतील सरासरी 23.23 आहे.

78 ही करनची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर 74 धावात 4 विकेट हि त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम  कामगिरी आहे.

काऊंटीतील सरे संघाचा कर्णधार राॅरी बर्न्सने 64.71 सरासरीने 1359 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 4 शतक ठोकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सरे संघाने 2002 पहिल्यांदा काऊंटीचे विजेतेपद पटकावले आहे.

28 वर्षीय राॅरी बर्न्सच्या या कामगिरीने  इंग्लडच्या संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीनंतर तो सलामीच्या फलंदाजाचा पर्यायाने पुढे आला आहे.

महत्वाच्या बातम्या-