ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू

विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 असे 5 वेळा विश्वचषक जिंकले आहे.विशेष म्हणजे या 5 विश्वचषक विजयातील ३ विश्वचषक असे होते, ज्यांच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवणारे खेळाडू एकाच शहरातील आहेत.

यात 1987, 2003, आणि 2015 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार अनुक्रमे डेविड बून, रिकी पॉन्टिंग आणि जेम्स फॉकनरला मिळाला होता. या तीनही खेळीडूंचा जन्म टास्मानियामधील लॉन्सेस्टन या शहरातील आहे. 

1987 साली झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात  डेविड बून यांनी इंग्लंड विरुद्ध 75 धावांची महत्वाची अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 5 बाद 253 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडला 8 बाद 246च धावा करता आल्या होत्या. 

2003 च्या विश्वचषकावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असणाऱ्या रिकी पॉन्टिंगने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध नाबाद 140 धावांची शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला 359 धावांचा टप्पा गाठून दिला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 234 धावांवरच सर्वबाद झाला. 

जेम्स फॉकनरने 2015 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात 36 धावा देत 3 विकेट्स घेऊन  न्यूझिलंडला 183 धावांवरच रोखण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाने नंतर हे आव्हान 33 षटकातच 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम

नव्या कर्णधाराने टोलावलेला चेंडू पडला माजी कर्णधाराच्या समोर, पुढे काय घडले पहाच

एकवेळ फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला तो गोलंदाज आज पाकिस्तान संघात जागा मिळण्यासाठी झगडतोय