संदीप नरवाल प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच खेळाडू

अहमदाबाद। प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमात शुक्रवारी(16 ऑगस्ट) 43 वा सामना यू मुंबा विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात यू मुंबाने 34-30 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयाबरोबरच यू मुंबाचा अष्टपैलू कबड्डीपटू संदीप नरवालने एक खास पराक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात 6 गुण मिळवले त्यामुळे आता त्याने प्रो कबड्डीमध्ये 500 गुणांचा टप्पा पार केला आहे. त्याचे आता प्रो कबड्डीमध्ये 109 सामन्यात 504 गुण झाले आहेत. यामध्ये त्याच्या चढाईमधील 234 गुणांचा आणि पकडीतील 270 गुणांचा समावेश आहे.

त्यामुळे तो चढाई आणि पकडीमध्ये प्रत्येकी 200 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून प्रो कबड्डीमध्ये एकूण 500 गुणांचा टप्पा पार करणारा दुसराच कबड्डीपटू ठरला आहे.

याआधी असा कारनामा मनजीत छिल्लरने केला आहे. मनजीतने प्रो कबड्डीमध्ये चढाईत 220 गुण आणि पकडीत 328 गुण असे मिळून 99 सामन्यात 548 गुण मिळवले आहेत.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात संदीपने चढाईमध्ये 3 आणि पकडीमध्ये 3 गुण मिळवले. यामध्ये त्याच्या एका सुपर टॅकलचाही समावेश होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर

सचिनला जे काम २०० कसोटीत जमले ते या गोलंदाजाने ६६ कसोटीतच केले