“चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धात सांगली, पुणे, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील संघ उपांत्य फेरीत.

चिंचपोकळी सार्वजनिक उस्तव मंडळ आयोजित “चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण, लाल मैदान येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या काळ (११ जानेवारी) तिसऱ्यादिवशी उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व सामने खेळवण्यात आले.

पहिल्या उपांत्यपूर्व सामना दुर्गामाता स्पो. मुंबई विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे यांच्यात झाला. मध्यंतरापर्यत १८-९ अशी आघाडी उत्कर्ष पुणे संघाकडे होती. पण त्यानंतर दुर्गामाता संघाने आपला खेल उंचावत उत्कर्ष संघावर लोन केला. अतितटीची हा सामना २८-२८ अशी बरोबरीत सुटला. दुर्गामाता संघाकडून करण कदम व अक्षय पालये ने चांगला खेळ केला. तर उत्कर्ष पुणे कडून नीरज गायकवाड व ओमकार घोडकेने चांगला खेळ केला. ५-५ चढाईमध्ये उत्कर्ष पुणे संघाने ७-६ अशी बाजी मारली.

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामना गोल्फादेवी सेवा मंडळ मुंबई विरुद्ध सम्राट क्रीडा मंडळ सांगली यांच्यात झाला. मध्यंतरपर्यत २२-१० अशी पुणे कडे आघाडी पुणे कडे होती. दुसऱ्या हाफ मध्ये गोल्फादेवी संघाने चांगले प्रयत्न केले पण अखेर ३८-३२ असा सामना पुणे संघाने जिंकला. पुणे कडून जबिर शेख व शिवकुमार मडसी यांनी चढाईत तर सुभाष ठाकूर ने पकडीत चांगला खेळ केला.

वाघजाई रत्नागिरी विरुद्ध सिद्धीप्रभा मुंबई यांच्यात झालेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात रत्नागिरी संघाने ४२-१४ असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. शुभम शिंदेने अष्टपैलू खेळ केला तर साईराज कुंभारने चांगल्या पकडी केल्या.

जय बजरंग क्रीडा मंडळ रायगड विरुद्ध श्री राम क्रीडा. पालघर यांच्यातील उपांत्यपूर्व सामना २६-१९ असा जय बजरंग संघाने विजय मिळवत उपांत्यफेरीत मिळवला. उपांत्य फेरीत जय बजरंग रायगड संघ विरुद्ध उत्कर्ष पुणे यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. तर सम्राट सांगली विरुद्ध वाघजाई रत्नागिरी यांच्यात उपांत्य सामना होईल.

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धा २०१९

उपांत्य फेरीचे सामने

१) उत्कर्ष क्री. मंडळ पुणे विरुद्ध जय बजरंग क्री. रायगड

२) सम्राट क्री. मंडळ सांगली विरुद्ध वाघजाई क्री. मंडळ रत्नागिरी