सानिया- फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप- उपांत्यपूर्व फेरीत

सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप-उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. त्यांनी यजमान ब्रिटनच्या ब्रॉडी-वॉटसन जोडीचा ६-३,३-६,६-४ असा पराभव केला.

सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स यांच्या स्पर्धेत १३व मानांकन आहे तर ब्रिटनच्या ब्रॉडी-वॉटसन ही जोडी बिगरमानांकीत होती. उपउपांत्यपूर्व फेरीत सानिया-फ्लिपकिन्स चा सामना तृतीय मानांकित मार्टिना हिंगीस आणि युंग जान चान जोडीशी होणार आहे.

आज सानियाचा मिश्र दुहेरीचा सामना असून तो थोड्याच वेळात सुरु होणार आहे.