सानिया मिर्झा आणि वडील यांच्यातील भावनिक नात्याची ही खास शॉर्ट फिल्म

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचे वडील इम्रान मिर्झा यांच्यावर आधारित खास स्टोरी यावेळीच्या फरहान अख्तरच्या ‘मर्द’ च्या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सानिया मिर्झाचा टेनिसमधील प्रवास अगदी ११व्या वर्षांपासून यात दाखवण्यात आला आहे.

जे पुरुष बलात्कार आणि लिंग भेदभाव यांच्या विरोधात आहेत त्यांच्यावरती खास शॉर्ट फिल्म बनवून जनजागृती केली जाते. फरहान अख्तरच्या या उपक्रमात यावेळी सानिया मिर्झा आणि तिचे वडील यांच्यावर ही शॉर्ट फिल्म बनवली गेली आहे.

आधी प्रिन्टिंग आणि नंतर बांधकाम व्यावसायिक असलेल्या इम्रान मिर्झा यांची ही स्टोरी. इम्रान मिर्झा यांना दोन मुली, एक सानिया दुसरी अनाम. समाज आणि नातेवाइकांकडून सानियाने टेनिस खेळू नये म्हणून नेहमीच सांगितले जायचे. तरीही त्यांनी कधी याबाबदल समाजाचं न ऐकता मुलींच्या म्हणण्याला प्राधान्य दिले त्याची ही गोष्ट.

फरहान अख्तरची कल्पना असलेली ही खरी गोष्ट आशिष साव्हानी यांनी दिग्दर्शित केली आहे.

खालील लिंकवर क्लिक करून ही स्टोरी पहा:

अनेक दिग्गजांनी या याबद्दल सानिया आणि वडिलांचे कौतुक केले आहे.