सानिया मिर्झाने दिल्या शुभेच्छा…

काल पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवून प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद जिंकल. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अतिशय जबदस्त कामगिरी करत हा संघ अंतिम फेरीत पोहचला आणि विजेतेपदाच्या सर्वात प्रबळ दावेदार भारतावर एकतर्फी विजय मिळवला.

यावर दिग्गज क्रीडापटूंनी प्रतिक्रिया दिल्या. भारताची टेनिस क्वीन सानिया मिर्झानेही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाला आणि पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या.

भारत क्रिकेटमध्ये जरी पराभूत झाला असला तरी हॉकीमध्ये पाकिस्तान विरुद्ध जिंकला आहे. भारतीय आणि पाकिस्तान दोन्ही विजयी संघांचे अभिनंदन केले. खेळ खरोखर सर्वांना समान पातळीवर आणतो.

याबरोबर तिने आयसीसीचा ट्विट रिट्विट केला आहे ज्यात शोएब मलिक आणि विराट कोहली हसून गप्पा मारत आहे.

सानिया मिर्झाने पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकशी २०१० लग्न केले असून काल चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात त्याचा समावेश होता. सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय महिला टेनिसपटू आहे जिने ग्रँडस्लॅम स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे तसेच आजपर्यंत तिच्या नावावर ६ विजेतेपद आहेत.