सानिया मिर्झाने एका शब्दात केले विराट कोहलीचे वर्णन!

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने आज ट्विटवरून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला चॅम्पियन म्हटले आहे. आज तिच्या ट्विटर अकाउंटला ७ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.

याबदल खुश होऊन तिने तिच्या चाहत्यांशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला.

या दरम्यानच तिला एका चाहत्यांकडून विराटबद्दल काय सांगशील असा प्रश्न आला त्यावर तिने एका वाक्यात विराट चॅम्पियन असल्याचे सांगितले.

विराटने नुकतेच काल जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजीत दुसरे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर तो वनडे आणि टी २० प्रकारात अव्वल स्थानी आहे.

त्याला सध्या भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती देण्यात आलेली आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन विराटला विश्रांती दिली आहे.

३१ वर्षीय सानिया मिर्झाला क्रीडा चाहते चांगले फॉलो करतात. त्यामुळे तिने तिच्या चाहत्यांशी साधलेला हा संवाद चाहत्यांना नक्कीच आनंद देऊन गेला.