एमएसएलटीए योनेक्स सनराईज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, करण रावत, राघव अमीन यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का 

पुणे:  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात करण रावत, राघव अमीन यांनी तर, मुलींच्या गटात सानिका भोगाडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 12वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकीत  सानिका भोगाडे हिने चौथ्या मानांकित दानिका फर्नांडोचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव केला.  अव्वल मानांकित  स्वरा काटकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पूर्वा भुजबळचा 6-1, 6-1असा सहज पराभव केला.  उर्वी काटेने संचिता नगरकरचा 6-0, 6-3 असा तर, चिन्मयी बागवेने प्रिशा दासचा 6-1, 6-0असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित आस्मि  आडकरने हिर किंगेरचे आव्हान 6-0, 6-0असे मोडीत काढले. 

12वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत बिगरमानांकीत करण रावतने चौथ्या मानांकित वेद ठाकूरचा 7-5, 4-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. राघव अमीनने कडवी झुंज देत आठव्या मानांकित आदित्य रायचा 3-6, 6-2, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.  समर्थ संहिताने गौतम मेहुलचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(7-5)असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित  ऋषिकेश अय्यरने केयूर म्हेत्रेला 6-1, 6-2असे नमविले. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुली:  उप-उपांत्यपूर्व फेरी:

स्वरा काटकर (1)वि.वि.पूर्वा भुजबळ 6-1, 6-1; 

उर्वी काटे वि.वि.संचिता नगरकर 6-0, 6-3;

सानिका भोगाडे वि.वि.दानिका फर्नांडो(4)6-3, 6-4;

चिन्मयी बागवे वि.वि.प्रिशा दास 6-1, 6-0;

प्राप्ती पाटील(6) वि.वि.सिया प्रसादे 6-2, 6-0;

आस्मि  आडकर(3) वि.वि.हिर किंगेर 6-0, 6-0;

आदिती लाखे(5) वि.वि.रिहाना रॉड्रीगेज 6-2, 6-1;  

आनंदी भुतडा वि.वि.मृण्मयी जोशी 6-4, 6-2;

12 वर्षाखालील मुले: पहिली फेरी:

ऋषिकेश अय्यर (1)वि.वि.केयूर म्हेत्रे 6-1, 6-2;

आर्यन सुतार वि.वि.आदित्य सुर्वे 6-3, 6-4;

पार्थ देवरुखकर(7)वि.वि.चिनार देशपांडे 6-1, 6-3;

केवल किर्पेकर(3)वि.वि.आकांश सुब्रमणियन 6-0, 6-1;

आदित्य तलाठी(6)वि.वि.सौमिल चोपडे  6-2, 6-1; 

समर्थ संहिता वि.वि.गौतम मेहुल 6-1, 7-6(7-5); 

करण रावत वि.वि.वेद ठाकूर(4)7-5, 4-6, 6-3;

राघव अमीन वि.वि.आदित्य राय(8)3-6, 6-2, 6-4;

अर्णव पापरकर वि.वि.अक्षजी  सुब्रमणियन  6-1, 6-0.