संजीवनी जाधवला सा.फु. पुणे विद्यापीठाच्या क्रिडा विभागाची ब्रॅन्ड अॅबेसिडर करण्याची मागणी

पुणे । २९व्या जागतिक विद्यापीठ अॅथलेटिक्स महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकुन सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागतिक स्तरावर मान उंचावेल्या संजीवनी जाधवला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रिडा विभागाची ब्रॅन्ड अॅबेसिडर करण्याची मागणी होत आहे.

या खेळाडूने आपल्या अभिमानास्पद कामगिरीने राज्याचा व देशाचा मान वाढवला आहे, त्याबरोबरीने कितीतरी मुलींना खेळांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखविणारे धावपटू देशाला देणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ाची संजीवनी खेळाडू आहे. नाशिकच्या भोसला महाविद्यालयात कला शाखेत पदव्युत्तर पदवीसाठी तिने प्रवेश घेतला आहे. तूच ‘क्रीडा मानसोपचार’ हा मुख्य विषय आहे

तिला सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रिडा विभागाची ब्रॅन्ड अॅबेसिडर करावी ह्या मागणीचे निवेदन खेळाडू संघर्ष समिती वतीने डाॅ. नितिन करमळकर (कुलगुरू सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांना ईमेल व्दारे करण्यात आली याप्रसंगी मा. शांताराम जाधव (अर्जुन पुरस्कार), शंकुतला खटावकर (अर्जुन पुरस्कार), सागर खळदकर (सदस्य पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन) व इतर खेळाडू उपस्थीत होते.