धोनीला कर्णधार पदावरून का हटविले? गोयंकांनी सांगितले कारण!

आयपीएल २०१७ ला सुरुवात होण्याआधीच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीला पुणे सुपर जायंट्सच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे टीम मालक संजीव गोयंका यांना धोनी फॅन्सच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यात त्यांचे बंधू हर्ष गोयंका यांनी काही वादग्रस्त ट्विट्स केल्यामुळे वाद आणखी वाढला.

८व्या मोसमांनंतर चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलमधून दोन वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या धोनीला पुणे संघाकडून खेळावे लागले. त्यात गेल्या आयपीएलला ८ संघांमध्ये पुणे ७व्या क्रमांकावर राहिले. चेन्नईला दोन आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग जिंकून देणाऱ्या या कर्णधाराला पुण्याचं नेतृत्व करताना अपयश आले.

परंतु पुण्याने या आयपीएलमध्ये जबदस्त वापसी करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे वादांना जास्त महत्त्व न देता संजीव गोयंका यांनी चांगल्या खेळावर लक्ष द्यायचं ठरवलं आहे. यावर भाष्य करताना गोयंका यांनी टेलिग्राफ बरोबर आपल मत मांडलं.

 

ते म्हणतात,

” कर्णधार बदलणे हा आता इतिहास झाला आहे. त्यावर सद्य स्थितीत चर्चा करून काही उपयोग नाही. एमएस धोनी संघाचा महत्वाचा अविभाज्य असा भाग आहे. धोनीने संघाला उपयुक्त असं मार्गदर्शन वेळोवेळी केलं आहे. सगळे खेळाडू मला सारखेच महत्वाचे आहेत. सगळ्या हातांना पाचच बोटे असतात. मग एकालाच दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्व कस देऊ शकतो? “

 

कर्णधार पदाबद्दल बोलताना गोयंका म्हणतात,

” स्मिथकडे क्षेत्ररक्षणाच्या जबदस्त रणनीती आहेत. त्याच्याकडे खेळाबद्दल चांगलं ज्ञान आहे. त्याचा खेळ सामाज्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. परंतु एकदा का त्याचे नेतृत्वगन काम करायला लागले कि त्याला विजयापासून थांबवणे अवघड असते. आम्ही १० पैकी शेवटचे ८ सामने त्यामुळेच जिंकलो. हा खरंच एक चांगला समाधान देणारा नंबर आहे. “

 

आयपीएलच्या कमिटीने यापूर्वीच पुणे आणि गुजरात पुढील आयपीएलमध्ये संकेत दिले आहेत. त्याबद्दल बोलताना गोयंका म्हणाले,

“मला अधिकृतपणे बीसीसीआयकडून कोणताही संदेश आलेला नाही. हा बीसीसीआयचा निर्णय असेल. परंतु मला माझा संघ आयपीएलमध्ये खेळात राहिलेला पाहायला आवडेल.”