संतोषकुमार घोष ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत संस्कार दाहेलकरची अष्टपैलू चमक; शिवाईचा शतकी विजय

मुंबई । हृदय मेहताच्या वेगवान 49 धावा आणि संस्कार दाहेलकरच्या घणाघाती 44 धावांच्या जोरावर शिवाई क्रिकेट अकादमीने 8 बाद 156 धावा केल्dया आणि त्यानंतर संस्कार आणि वेदांत लाड यांच्या वेगवान माऱयाने ब्राव्हो क्रिकेट अकादमीचा डाव अवघ्या 50 धावांत गुंडाळून 12 वर्षाखालील मुलांच्या संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेत 106 धावांच्या मोठ्या विजयाची नोंद केली.

तसेच आज झालेल्या पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यात विजय क्रिकेट अकादमी, अचिव्हर क्रिकेट अकादमी यांनी जोरदार विजयाची नोंद केली.

शिवाजी पार्पवर सुरू असलेल्या स्पर्धेत शिवाई क्रिकेट अकादमीच्या संस्कार दाहेलकरने अष्टपैलू चमक दाखवताना आधी हृदय मेहताबरोबर शतकी सलामी देत 44 धावांची घणाघाती खेळी साकारली आणि नंतर ब्राव्होचे 3 मोहरे अवघ्या 5 धावांत गुंडाळून संघाला स्पर्धेतला मोठा विजय मिळवून दिला.

विजय क्रिकेट अकादमीने 99 धावांचे आव्हान स्पोर्टस्मनसमोर ठेवले होते. पण यशस्वी गुप्ता आणि ताहा खान यांनी स्पोर्टस्मनचा डाव 15 षटकांत 77 धावांतच गुंडाळला. अचिव्हरचेसुद्धा 104 धावांचे आव्हान कॅव्हेलियर क्लबला पेलवले नाही.

संक्षिप्त धावफलक

विजय क्रिकेट अकादमी- 20 षटकांत 4 बाद 98 (शिर्के 30, भावेश चव्हाण 46 ; आयुष गुप्ता 21 धावांत 2 बळी, कार्तिकेयन राजपूत 22 धावांत 2 बळी) वि. वि. स्पोर्टस्मन क्रिकेट अकादमी – 15 षटकांत सर्वबाद 77 ( भाग्येश शिखरे 31, निर्मित शाह 20, श्रवण शेट्टी 21; यशस्वी गुप्ता 13 धावांत 3 बळी, शाश्वत बोम्मा 15 धावांत 2 बळी, ताहा खान 13 धावांत 3 बळी)

अचिव्हर क्रिकेट अकादमी – 20 षटकांत 8 बाद 103 (सोहम सली 35, शिवम नेवरेकर 29, देव्यांशु मिश्रा 24 ; आयुष गुप्ता 14 धावांत 3 बळी, देव दमानिया 20 धावांत 3 बळी) विजयी वि.कॅव्हेलियर क्रिकेट क्लब – 15.4 षटकांत सर्वबाद 65 ( आर्यन गांधी 28, ओम पांडे 24; निहार भुते 6 धावांत 3 बळी, यश शेट्ये 8 धावांत 3 बळी, रघुवेद सावंत 12 धावांत 3 बळी)

शिवाई क्रिकेट अकादमी – 20 षटकांत 8 बाद 156 (हृदय मेहता 49, संस्कार दाहेलकर 44, विप्लव पाटील 29 ; आयुष मकवाना 38 धावांत 3 बळी, संचित कदम 20 धावांत 2 बळी) वि. वि. ब्राव्हो क्रिकेट अकादमी – 18 षटकांत सर्वबाद 50 ( ध्रूव तन्वीर 28, जय व्यास 18 ; संस्कार दाहेलकर 5 धावांत 3 बळी, वेदांत मेहता 8 धावांत 3 बळी)