पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कालपासून विशेष गाजत आहे. त्यात सर्फराज पत्रकार परिषदसाठी आलेल्या पत्रकार कोणत्या भाषेत प्रश्न विचारणार आहेत याची चौकशी करताना दिसत आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषद मधील पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यात सर्फराज कुणालातरी विचारात आहे की आलेले सर्व पत्रकार इंग्लिश बोलणाराने आहेत का? त्याला कुणीतरी काय असं विचारत तर त्याला पुन्हा सर्फराज तोच प्रश्न विचारताना दिसत आहे.

सर्फराज अहमदच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान संघ उपांत्यफेरीत पोहचला असून त्याने श्रीलंकेविरुद्ध ६१ धावांची नाबाद खेळी केली होती.

महा स्पोर्ट्स भूमिका:
खेळाडूंकडे पूर्णपणे खेळ भावनेने पहिले गेले पाहिजे. कोणत्याही खेळाडूच मुख्य काम आहे चांगला खेळ करून आपल्या संघाला विजयी करणं. त्या खेळाडूच्या कामिगिरीबद्दल टीकाटिप्पणी नक्कीच होऊ शकते परंतु अशा वैयक्तिक गोष्टींबद्दल चर्चा होऊ नयेत. फुटबॉल किंवा टेनिस खेळात दिग्गज खेळाडूंना इंग्लिश भाषा व्यवस्थित बोलता येत नाही म्हणून त्यांची महानता किंवा कामगिरी नक्कीच कमी आहे असं आपण म्हणू शकत नाही.