सातारा जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा उद्यापासून

सातारा जिल्हा कबड्डी असोशियशनच्या मान्यतने आणि जयदुर्गा नवरात्रोउसत्व मंडळ खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा कुमार गट व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक २६ आॅगस्ट २०१८ रोजी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. २६ ऑगस्टला पहिल्या दिवशी कुमार गटाचे सामने होतील. तर २७ ऑगस्ट रोजी कुमारी गटाचे सामने होतील. ही स्पर्धा खंडाळा येथील जयदुर्गा नवरात्रोत्सव, खंडाळा बाजार समितीच्या मैदानात होणार आहे.

स्पर्धेतून काय हाती लागणार?

या स्पर्धेतील संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबीरानंतर मुले आणि मुलींच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ ४५ व्या कुमार/कुमारी गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत सातारा जिल्हाचे प्रतिनिधित्व करेल.

करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच दोन कांस्यपदके

आयपीएलमध्ये या दोन संघांसाठी असतील दोन आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक

केराॅन पोलार्डचा टी२०मध्ये धमाका, एकाच षटकात केल्या ३० धावा