सत्यम कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, एचडीएफसी बॅंक संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पुणे । सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित 4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20क्रिकेट स्पर्धेत सत्यम व्हेकेशन्स, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, सनगार्ड/एफआयएस, एचडीएफसी बॅंक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात संजय जोशीच्या 79 धावांच्या बळावर सत्यम व्हेकेशन्स संघाने इन्फोसिस संघाचा 25 धावांनी पराभव केला.

पहिल्यांदा खेळताना सत्यम व्हेकेशन्स संघाने 20 षटकात 6 बाद 175 धावा केल्या. 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राज मोहिते व संकेत सोनावणे यांच्या अचुक गोलंदाजीपुढे इन्फोसिस संघ केवळ 16.4 षटकात सर्वबाद 151 धावांत गारद झाला. संजय जोशी सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत अभिमन्यु ढमढेरेच्या अचुक गोलंदाजीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने दसॉल्ट सिस्टिम्स संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना दसॉल्ट सिस्टिम्स संघाने 20 षटकात 8 बाद 140 धावा केल्या.

140 धावांचे लक्ष शंतनू बुट्टेपाटीलच्या 49 व अमित गणपुळेच्या नाबाद 42 धावांसह सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने केवळ 15.5 षटकात 2 बाद 142 धावांसह पुर्ण केले. अभिमन्यु ढमढेरे सामनावीर ठरला.

अन्य लढतीत सुधाकर भोसलेच्या 61 धावांच्या जोरावर एचडीएफसी बॅंक संघाने अँमडॉक्स संघाचा 4 गडी राखून पराभव केला तर प्रशांत पोळच्या नाबाद 62 धावांच्या बळावर सनगार्ड/एफआयएस ग्लोबल संघाने सिनेक्रॉन संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सत्यम व्हेकेशन्स- 20 षटकात 6 बाद 175 धावा(संजय जोशी 79, शुभम नागवडे नाबाद 21, संजय पुरोहीत 3-29) वि.वि इन्फोसिस – 16.4 षटकात सर्वबाद 151 धावा(संजय पुरोहीत 20, संदिप शांघाई 29, आशय पालकर 24, गौरव बबेल 26, राज मोहिते 2-34, संकेत सोनावणे 3-7) सामनावीर- संजय जोशी
सत्यम व्हेकेशन्स संघाने 25 धावांनी सामना जिंकला.

दसॉल्ट सिस्टिम्स- 20 षटकात 8 बाद 140 धावा(श्रीधर के 29, अंशूल गोस्वमी 22, स्वप्निल काळे 25, अभिमन्यु ढमढेरे 4-21, केतन पासलकर 2-20) पराभूत वि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 15.5 षटकात 2 बाद 142 धावा(शंतनू बुट्टेपाटील 49, कुमार ठक्कर 28, अमित गणपुळे नाबाद 42, प्रफुल्ल मानकर नाबाद 21, श्रीधर के 2-13) सामनावीर- अभिमन्यु ढमढेरे
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.

सिनेक्रॉन- 20 षटकात 8 बाद 87 धावा(मयुर सामंत 27, सुमित चावडा 2-10, सुरज दुबल 2-15, पवन आनंद 2-15) पराभूत वि सनगार्ड/एफआयएस ग्लोबल – 10 षटकात 1 बाद 89 धावा(प्रशांत पोळ नाबाद 62, संजय सिंग 1-20) सामनावीर- प्रशांत पोळ
सनगार्ड/एफआयएस ग्लोबल संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.

अँमडॉक्स- 20 षटकात 7 बाद 183 धावा(निखिल पेंढारकर 39, रोहित लालवानी 25, आवेश सय्यद 65, भावनीश कोहली 21, अंबर देशपांडे 3-25, स्वप्निल जोरी 2-30) पराभूत वि एचडीएफसी बँक – 16.3 षटकात 6 बाद 187 धावा(सुशील शेवाळे 32, सुधाकर भोसले 61, शंभुराजे घुले 20, अंबर देशपांडे 30, अच्युत मराठे नाबाद 21, भावनीश कोहली 2-46, आवेश सय्यद 2-50) सामनावीर- सुधाकर भोसले
एचडीएफसी बॅंक संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.