कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, सत्यम व्हेकेशन्स, वेंकीज संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे । सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित 4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, सत्यम व्हेकेशन्स, वेंकीज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत स्नेहल कासारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एचडीएफसी बँक संघाचा 31 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्यांदा खेळताना शंतनू बुट्टेपाटीलच्या 53 व निखिल भुजबळच्या 46 धावांसह सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एचडीएफसी बँक संघ तीन चेंडू बाकी असताना सर्वबाद 133 धावांत गारद झाला. स्नेहल कासारने 4 तर प्रफुल मानकर 3 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. स्नेहल कासार सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत दिव्यांग हिंगणेकर च्या जलद शतकी खेळीच्या बळावर सत्यम व्हेकेशन्स संघाने सनगार्ड/एफआयएस ग्लोबल संघाचा 148 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सत्यम व्हेकेशन्स संघाने 20 षटकात 5 बाद 231 धावा केल्या.

यात दिव्यांग हिंगणेकरने केवळ 43 चेंडूत 107 धावा केल्या. 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संकेत सोणावने, दिग्विजय देशमुख व राज मोहिते यांच्या अचूक गोलंदाजीपुढे सनगार्ड/एफआयएस ग्लोबल संघ केवळ 17 षटकात सर्वबाद 84 धावांत गारद झाला. दिव्यांग हिंगणेकर सामनावीर ठरला.

अन्य लढतीत सागर बिर्डवडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेंकीज संघाने इन्फोसिस संघाचा 2 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना आशय पालकरच्या 57 धावांच्या जोरावर इन्फोसिस संघाने 20 षटकात 8 बाद 152 धावा केल्या.

152 धावांचे लक्ष अदित्य कदमच्या 50 तर सागर बिर्डवडेच्या नाबाद 49 धावांसह वेंकीज संघाने 18.2 षटकात 8 बाद 153 धावांसह पुर्ण करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सागर बिर्डवडे सामनावीर ठरले.


स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी:
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 20 षटकात 6 बाद 164 धावा
(शंतनू बुट्टेपाटील 53, निखिल भुजबळ 46, प्रफुल मानकर 22, नविन पांडे 2-25) वि.वि एचडीएफसी बँक- 19.3 षटकात सर्वबाद 133 धावा(शाम नंनदरगी 21, अविनाश जाधव 35, सुधाकर भोसले 43, स्नेहल कासार 4-33, प्रफुल मानकर 3-24) सामनावीर- स्नेहल कासार
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 31 धावांनी सामना जिंकला.

सत्यम व्हेकेशन्स- 20 षटकात 5 बाद 231 धावा(दिव्यांग हिंगणेकर 107(43), संजय जोशी 23, अनंत अभिषेक 31, विराज काकडे 25, अमित कदम नाबाद 33, सुमित चावडा 3-40) वि.वि सनगार्ड/एफआयएस ग्लोबल- 17 षटकात सर्वबाद 84 धावा(प्रशांत पोळ 31, संकेत सोणावने 3-10, दिग्विजय देशमुख 3-8, राज मोहिते 2-22) सामनावीर- दिव्यांग हिंगणेकर
सत्यम व्हेकेशन्स संघाने 148 धावांनी सामना जिंकला.

इन्फोसिस- 20 षटकात 8 बाद 152 धावा(आशय पालकर 57, साईनाथ शिंदे 26, शारॅन थॉम्सन नाबाद 30, अमित सिंग 4-12, मयुर टिंगरे 2-24, सागर बिर्डवडे 2-34) पराभूत वि वेंकीज- 18.2 षटकात 8 बाद 153 धावा(अदित्य कदम 50, सागर बिर्डवडे नाबाद 49, संजय पुरोहीत 2-32, रवी थापलीयाल 3-35) सामनावीर- सागर बिर्डवडे
वेंकीज संघाने 2 गडी राखून सामना जिंकला.