शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

एशियन गेम्स 2018चा सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरीने इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आज (6सप्टेंबर) सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याने हे पदक ज्युनियर 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मिळवले आहे.

16 वर्षीय, सौरभ पात्रता फेरीत 581 गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर होता. अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकताना ज्युनियर गटात स्वत:हचाच विक्रम मोडत एक नवीन विश्वविक्रम केला आहे. यावेळी त्याला एकूण 245.5 गुण मिळाले.

तसेच भारताच्याच अर्जुन सिंग चीमाने याच प्रकारात 218 गुण मिळवत कांस्य आणि कोरियाच्या होजीन लीमला रौप्य पदक मिळाले.

सौरवने पहिल्यापासूनच त्याचे वर्चस्व कायम ठेवले होते.

त्याचबरोबर सौरभ, अर्जुन आणि अनमोल जैन यांनी पुरूष संघातही 1730 गुण मिळवत सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तर 1732 गुण मिळवत कोरियाने सुवर्ण पदक जिंकताना एक नवीन विक्रम केला. तर रशियाला 1711 गुण मिळाल्याने कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

तसेच याआधीच भारताच्या महिला नेमबाज अपूर्वी चंदेला आणि अंजुम मोदगील यांनी महिलांच्या 10 मीटर एयर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

ब्राझिलचा रोनाल्डो बनला ला लीगामधील या क्लबचा मालक

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप