एशियन गेम्स: नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक

जकार्ता येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये सौरभ चौधरीने पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्णपदक तर अभिषेक वर्माने कांस्यपदक जिंकले. भारतासाठी हे नेमबाजीतील पहिले तर स्पर्धेतील तिसरे सुवर्ण आहे.

तसेच चौधरी हा एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणार पाचवा भारतीय खेळाडू आहे.

१६ वर्षीय सौरभ हा पहिल्यांदाच वरिष्ठ गटात खेळत आहे. यावेळी २०१०च्या वर्ल्ड चॅम्पियन जपानच्या टोमोयुकी मटसुदाला पराभूत केले. शेवटच्या फेरीत सौरभने २४०.७ गुण मिळवले. मटसुदाने २३९.७ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.

यामध्येच २९ वर्षीय वर्माने २१९.३ गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. त्याचे हे पहिलीच एशियन गेम आहे. दोनच महिन्यापूर्वी चौधरीने कुमार गटातील विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले आहे.

या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंत ९ पदके जिंकली असून त्यात प्रत्येकी ३ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय महिला कबड्डी संघाचा आशियाई स्पर्धेत विजयी चौकार, साक्षी कुमारीचा अष्टपैलू खेळ

केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे