भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ लगेच वेस्ट इंडिजला ५ वनडे आणि एक टी-20 सामना खेळण्यासाठी रवाना झाला आहे.

रिषभ पंत आणि कुलदीप यादव हे दोन युवा खेळाडू या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला भारतातून रवाना झाले आहे तर उर्वरित संघ इंग्लंडमधूनच तिकडे आज रवाना झाला.

भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारत या दौऱ्यात जे ५ वनडे आणि एक टी-20 खेळणार आहे त्यांचं वेळापत्रक खालीलप्रमाणे

२३ जून- पहिली वनडे, सायंकाळी ६:३०
२५ जून- दुसरी वनडे, सायंकाळी ६:३०
३० जून- तिसरी वनडे, सायंकाळी ६:३०
२ जुलै- चौथी वनडे, सायंकाळी ६:३०
६ जुलै- पाचवी वनडे, सायंकाळी ७:३०
९ जुलै- टी-20, रात्री ९:३०

भारतीय संघ : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रिशभ पंत, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक