विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना

पर्थ | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवसाखेर भारताने ६९ षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ८२ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५१ धावांवर खेळत आहे.

विराटचे हे २०वे अर्धशतक असून जर उद्या त्याने शतकी खेळी केली तर त्याचे हे कसोटीतील २५ वे शतक ठरेल.

संगकारा- पाॅटिंगच्या विक्रमाची बरोबरी- 

यावर्षी विराटने ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७२.०८च्या सरासरीने २५९५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १० शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.

याबरोबर त्याने एक खास विक्रम केला आहे. एका वर्षात १९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम त्याने ४ वेळा केला आहे. यापुर्वी केवळ कुमार संगकारा आणि रिकी पाॅटिंगने ४ वेळा एका वर्षात १९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

निवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव

सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!