सेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री

फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टनला अवघ्या ९ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत मोसमातली पहिली, मेलबर्न ग्रांप्री स्पर्धेत विजय मिळवला .

कायमच चुरशीची लढत असल्यामुळे फेरारी आणि मर्सिडीज यात कोण बाजी मारणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच होती. मेलबर्न ग्रांप्री मध्ये मात्र फेरारीने बाजी मारत विजय साजरा केला. वायुगतियामिक (एरोडायनॅमिकस ) मध्ये झालेल्या बदलांमुळे वळणांवर आघाडी घेणं अवघड जात असल्याचे हॅमिल्टन म्हणाला. पण इतक्या चुरशीची लढत झाल्यामुळे पुढच्या ग्रांप्री मात्र मजा येईल असे ही हॅमिल्टन म्हणाला. मेलबॉर्नचा ट्रॅक एकूणच अवघड होता असे व्हेटेलचे सुद्धा मत होते. फेरारी आणि मर्सिडीज यांची इतकी चुरस नवीन व्ही-६ टर्बो इंजिन युगानंतर प्रथमच पहायला मिळाली.

व्हेटेलचा २०१५ नंतरचा हा पहिलाच विजय आहे. हॅमिल्टन सारख्या अनुभवी खेळाडू बरोबर अश्याच अनेक ग्रांप्रीमध्ये मजा येईल असेही व्हेटेल म्हणाला. व्हेटेलने त्याच्या टीमचे देखील आभार मानले व या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे असेही तो म्हणाला. आपण जे करतो त्यावर आपले प्रेम हवे आणि हीच गोष्ट मी फेरारीत प्रवेश करताना म्हणालो होतो असे त्याने सांगितले.

आकडेवारी:

सेबॅस्टियन व्हेटेलचा ४३ वा विजय

फेरारीचा २२६ वा विजय

ग्रांप्री क्रमांक ९५७