पहा कुलदीप यादवची हॅट्रिक !

कोलकाता । येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५० धावांनी विजय मिळवला. यात कर्णधार विराट कोहलीच्या ९२ धावांचा आणि चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या हॅट्रिकचा सिहांचा वाटा होता. भारतने हा सामना जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी बढत मिळवली आहे.

वनडे मध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक घेतली आहे. कुलदीपची ही आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिली हॅट्रिक नाही, त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.

अशी घेतली कुलदीपने हॅट्रिक:

कुलदीपला या सामन्यात ३३व्या षटकाच्या आधी पर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती. कुलदीपने ७ षटकात ३९ धावा दिल्या होत्या. कर्णधार कोहलीने जेव्हा त्याला गोलंदाजीला आणले तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्तिथी १४८-५ अशी होती.

३३.२ कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक फलंदाज वेडला त्रिफळाचित केले ! शरीराजवळचा चेंडू कट मारण्याच्या नादात वेडच्या बॅटच्या तळाचा कड लागून चेंडू यष्टीजवळ टप्पा खाऊन बेल्सला लागला आणि वेड ८ चेंडूत २ धावा करून बाद झाला.

३३.३ विराट कोहलीने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले कारण फलंदाजीला, गोलंदाज एगार आलेला होता. एगार पायचीत बाद ! सरळ चेंडू खेळताना एगारच्या मागील पायाला चेंडू लागला आणि तो शून्य धावा करून तंबूत परतला. एगारने रिव्हियू घेण्याचा प्रयत्न केला पण स्टोइनीसने त्याला साफ नकार दिला.

३३.४ कमिन्स बाद ! धोनीचा उत्कृष्ट झेल ! वनडे मध्ये भारताकडून हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय बनला हा चायनामॅन गोलंदाज. गुगली चेंडू कमिन्सला कळलाच नाही आणि त्याच्या बॅटचा कड लागून धोनीने उत्कृष्ट झेल घेत कमिन्सला शून्य धावात बाद केले.

व्हिडिओ: