जाणून घ्या विराट कोहलीचे क्रिकेटमधील गुरु !

भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधार विराट कोहली हा सध्या जबदस्त फॉर्ममध्ये आहे. वन-डे क्रिकेटमध्ये वयाच्या २८व्या वर्षी तब्बल ३० शतके करणाऱ्या या खेळाडूने मोठ्या खेळाडूंचे विक्रम मोडले आहे.

साहजिकच या खेळाडूचा नक्की गुरु किंवा कोच कोण असेल म्हणून क्रिकेट प्रेमी म्हणून आपणा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. परंतु काल शिक्षक दिनाच्या दिवशीच विराटने एक खास ट्विट करून आपल्या सर्व गुरूंची नावे सांगितली आहेत. त्यातही त्याने विशेष करून क्रिकेट जगतातील गुरूंची नावे सांगितली आहेत.

विराटने जगातील सर्व गुरूंना ट्विटरवर शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, कपिल देव, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, शॉन पॉलाक, व्हिव्हियन रिचर्स, रिकी पॉन्टिंग, ग्लेन मॅकग्रा, ब्रायन लारा, सनाथ जयसूर्या, शेन वॉर्न, जॅक कॅलिस, ऍडम गिलख्रिस्ट, डोनाल्ड ब्रॅडमन , जावेद मियाँदाद, इम्रान खान, स्टिव्ह वॉ, इंझमाम उल हक या खेळाडूंचा त्याने आवर्जून उल्लेख केला आहे.

विशेष म्हणजे विराट गुरु मानत असलेल्या या खेळाडूंचे सर्व विक्रम आजकाल विराट मोडत आहे. त्यामुळे याचा विराटच्या या गुरूंना नक्कीच आनंद होईल यात शंका नाही.