रियल मॅद्रिद नाही तर यांनी दिला बार्सिलोनाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

एल क्लासिको म्हणजे मैदानावर वाद आणि भांडण तर होणारच असा इतिहास तरी सांगतो पण या हंगामातील दुसऱ्या क्लासिकोच्या आधीच वाद चालू झाले.

ला लीगाच्या मागील आठवड्याच्या सामन्यात बार्सिलोनाने डेपोर्टिओवर ४-२ ने विजय मिळवत आपले लीगाचे विजेतेपद निश्चित केले. या विजयानंतर त्यांनी ला लीगा आणि कोपा डेलरेचे विजेतेपद शहरात मिरवणूक काढत साजरे केले.

पण परंपरेनुसार एखादे विजेतेपद जिंकल्यानंतर पुढील होणाऱ्या सामन्यात विरोधी संघ विजेत्या संघाला गार्ड ऑफ ऑनर देतो. कोपा डेलरेच्या विजेतेपदानंतर डेपोर्टिओने बार्सिलोनाला गार्ड ऑफ ऑनर दिला होता.

आता ला लीगा जिंकल्यानंतर पारंपारिक प्रतिस्पर्धी मॅद्रिदने गार्ड ऑफ ऑनर देणार असे वाटत असतानाच लीगाचे विजेतेपद जिंकलेल्या बार्सिलोनाला आम्ही सन्मानार्थ वंदना (गार्ड ऑफ ऑनर) देणार नाही कारण क्लब वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांनी आम्हाला दिला नव्हता असा युक्तीवाद झिदानने दिला.

आम्ही क्लब वर्ल्डकप या स्पर्धेत खेळलो नाही म्हणून आम्ही गार्ड ऑफ ऑनर दिला नव्हता अशी प्रतिक्रिया बार्सिलोनासंघातर्फे आली. यावर सुद्धा झिदानने आम्ही गार्ड ऑफ ऑनर देणार नाही असे स्पष्ट केले.

म्हणून परंपरा टिकावी आणि बार्सिलोनाच्या खेळाडूंना त्यांनी केलेल्या प्रदर्शनाचे फळ म्हणून बार्सिलोनाच्या प्रशिक्षक आणि सर्व इतर सहकार्यांनी सामन्याच्या अखेरीस गार्ड ऑफ ऑनर दिला.

काय आहे गार्ड ऑफ ऑनर?

यात विजयी संघाचे जेव्हा मैदानात आगमन होते तेव्हा विरोधी संघाचे सर्व खेळाडू दोन्ही बाजूला उभे राहून टाळ्या वाजवत विजयी संघाच्या खेळाडूंचे स्वागत करतात.