लिटिल चॅम्पियनशिप 2018 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा, तेज ओक यांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत  नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

आरपीटीए टेनिस कोर्ट,पाषाण येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 8वर्षाखालील मिश्र गटात नीरज जोर्वेकर याने सातव्या मानांकित अमीन क्षितिजचा 5-1असा सनसनाटी पराभव केला. 

अव्वल मानांकित नामिश हूडने विहान पटनीला 5-1असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित आर्यन कीर्तनेने पाचव्या मानांकित सुजय देशमुखचा 5-1असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 

10वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकीत  वैष्णवी सिंगने अव्वल मानांकित मेहक कपूरचा 5-2असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.

चौथ्या मानांकित रित्सा कोंडकरने प्रेक्षा प्रांजलचा 5-2असा तर, काव्या देशमुखने काम्या चोपडाचा 5-0असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित  प्रिशा शिंदेने जास्मिन कटारियाला 5-1असे नमविले. 

10वर्षाखालील  मुलांच्या गटात  तेज ओक याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित कार्तिक शेवाळेचा 5-1असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.  अमन शहाने चौथ्या मानांकित पृथ्वीराज हिरेमठचा 5-3असा पराभव करून आगेकूच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

उपांत्यपूर्व फेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नामिश हूड(1)वि.वि.विहान पटनी 5-1;रित्सा कोंडकर(4)वि.वि.आदित्य योगी5-1;नीरज जोर्वेकर वि.वि.अमीन क्षितिज(7)5-1;आर्यन कीर्तने(2)वि.वि.सुजय देशमुख(5) 5-1; 

10वर्षाखालील मुली: वैष्णवी सिंग वि.वि.मेहक कपूर(1) 5-2; रित्सा कोंडकर(4)वि.वि.प्रेक्षा प्रांजल 5-2; काव्या देशमुख वि.वि.काम्या चोपडा 5-0; प्रिशा शिंदे(2)वि.वि.जास्मिन कटारिया 5-1;

10वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी(1)वि.वि.नमिश हूड(7)5-3; अवनिश चाफळे(3)वि.वि.शिवांश कुमार 5-2; अमन शहा वि.वि.पृथ्वीराज हिरेमठ(4)5-3;तेज ओक वि.वि.कार्तिक शेवाळे(6)5-1.