नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत स्वरदा परब, अमन तेजाबवाला यांचा सनसनाटी विजय

पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज्  टेनिस स्पर्धेतमुलींच्या गटात बिगर मानांकीत स्वरदा परबने दुस-या मानांकीत गार्गी पवारचा तर मुलांच्या गटात बाराव्या मानांकीत अमन तेजाबवालाने अव्वल मानांकीत उदित गोगोईचा  पारभव करत सनसनाटी निकालाची नोंद केली. 

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत  मुलींच्या गटात बिगर माानांकीत स्वरदा परबने दुस-या मानांकीत गार्गी पवारचा 6-1, 6-4 असा दोन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकीत भक्ती शहाने पंधराव्या मानांकीत श्रेया चक्रवर्तीचा 7-6(8), 6-2  असा टायब्रेकमध्ये तर पाचव्या मानांकीत शरण्या गवारेने तिस-या मानांकीत संजना सिरीमुल्लाचा 3-6, 6-4, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

मुलांच्या गटात बाराव्या मानांकीत अमन तेजाबवालाने अव्वल मानांकीत उदित गोगोईचा संघर्षपुर्ण लढतीत 7-6(4), 2-6, 6-3 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. चौथ्या मानांकीत क्रिश पटेलने सातव्या मानांकीत  आर्यन भाटियाचा  6-2, 6-4 असा तर तिस-या मानांकीत दिवेश गेहलोतने नवव्या मानांकीत हिरक वोराचा  6-3,7-5 असा पराभव केला. दुस-या मानांकीत सुशांत दबसने सहाव्या मानांकीत अर्णव पतंगेचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:  16 वर्षाखालील मुलीउपांत्यपुर्व फेरी:  

भक्ती शहा(7)वि.वि.श्रेया चक्रवर्ती(15) 7-6(8), 6-2 

शरण्या गवारे(5)वि.वि. संजना सिरीमुल्ला(3)  3-6, 6-4, 6-0

विपाशा मेहरा वि.वि अदिती अरे 6-0, 6-3

स्वरदा परब वि.वि गार्गी पवार (2)6-1, 6-4

मुले- अमन तेजाबवाला(12)वि.वि. उदित गोगोई(1) 7-6(4), 2-6, 6-3

क्रिश पटेल(4)वि.वि.   आर्यन भाटिया(7)  6-2, 6-4

दिवेश गेहलोत(3) वि.वि हिरक वोरा (9) 6-3,7-5

सुशांत दबस(2)वि.वि अर्णव पतंगे (6)6-2, 6-2.