रॉस टेलरला आधार कार्ड मिळू शकते का? सेहवागचा सवाल

पुणे । रॉस टेलर-वीरेंद्र सेहवाग यांच्यातील सोशल मीडियावरील युद्ध आता काही थांबायचे नाव घेत नाही. काल रॉस टेलरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो एका बंद दुकानाजवळ बसला आहे आणि त्या दुकानाचे नाव एस एस टेलर असे आहे.

टेलरने पोस्ट केलेल्या त्याच्या पोस्टमध्ये हिंदीत लिहिले आहे की ” सेहवाग राजकोटमध्ये सामन्यानंतर दर्जी टेलरचे दुकान बंद आहे. पुढची शिलाई तिरुअनंतपुरम मध्ये होईल. तू जरूर ये.”

या पोस्टला आज सेहवागने खास शैलीत उत्तर दिले.

सेहवागने आधार कार्डच्या अधिकृत सोशल मीडियाला टॅगकरून म्हटले आहे की रॉस टेलरच्या हिंदीने प्रभावित झालो आहे. त्याला हिंदी बोलण्याच्या कौशल्यावर आधार कार्ड मिळू शकते का?

विशेष म्हणजे आधार कार्डच्या अकाउंटवरूनही याला खास उत्तर देण्यात आले आहे. भाषा बोलण्याला महत्व नाही. तो येथील नागरिक असायला हवा असे त्यावरून उत्तर आले आहे. शिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये परदेशी नागरिकांना आधार मिळण्यासाठी काय पात्रता असते तेही लिहिले आहे.