सेहवाग- रॉस टेलरमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध, टेलरने केला हिंदीत ट्विट !

मुंबई । भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या मजेशीर ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. अगदी आपल्या वाढदिवसालाही त्याने आपली असे ट्विट करायची परंपरा सोडली नाही.

सध्या समालोचकाची भूमिका पार पाडत असलेला सेहवाग प्रत्येक सामना झाला की त्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला टॅग करून काही ना काही ट्विट करतो. त्यातील काही ट्विट सेहवागला वाह-वाह मिळवून देतात तर काही ट्विट अंगलट येतात तरीही सेहवाग हे ट्विट करायचे कधीही बंद करत नाही.

काल न्यूजीलँडच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या टेलरलाही सेहवागने असाच काहीसा ट्विट केला. ज्यात सेहवाग म्हणतो, ” मस्त खेळला रॉस टेलर दर्जी जी. दिवाळीच्या कपडे शिवायच्या एवढ्या ऑर्डर असूनही तुम्ही परिस्थिती चांगली हाताळली. “

यावर टेलरनेही हिंदीत ट्विट करून सेहवागला उत्तर दिले, ” धन्यवाद वीरू भाई. आपली ऑर्डर वेळेत पाठवा म्हणजे पुढच्या वेळी मी दिवाळीला लवकर पाठवून देईल. दिवाळीच्या शुभेच्छा. “

यावर सेहवागने वेळ मारत नेत पुन्हा ट्विट केला, ” धन्यवाद मास्टरजी, ह्या वेळी पायजमाच पुढच्या वेळी कमी करून द्या. रॉस आहे बॉस. खेळाडू वृत्ती. “

पुढे दुसऱ्या ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, ” तुझ्या उच्च दर्जाच्या शिलाईची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. मग टी पॅन्टची शिलाई असो किंवा भागीदारीची. “