जेव्हा चित्रपटगृहात सेहवाग पहातो क्रिकेटचा सामना तर त्याची बायको पहाते चित्रपट!

वीरेंद्र सेहवाग रोज त्याच्या ट्विटरमुळे चर्चेत असतो. काहीतरी गमतीदार गोष्टी तो या माध्यमातून शेअर करतच असतो. असाच एक ट्विट काल मुंबई विरुद्ध पुणे हा आयपीएल सामना सेहवाग केला.
त्याच झालं असं काल होती मुंबई विरुद्ध पुणे ही क्वालिफाय राऊंडचा सामना. ज्या संघाचा सेहवाग कोच आहे तो संघ आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे. सेहवागने ट्विटरवर पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की बायको आनंदी असणे म्हणजे जीवन आनंदी असणे. आता सिनेमागृहात मी मुंबई विरुद्ध पुणे सामना पाहतोय तर बायको चित्रपट पाहतेय. तीही खुश आणि मीही खुश.

त्याबरॊबर सेहवागने सामना पाहतानाचा त्याचा फोटोही ट्विट केला आहे.