पाकिस्तानला मोठा डोस (समज ) द्यायला पाहिजे : विरेंदर सेहवाग

भारतीय संघाचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि सेहवाग हे आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी बरेच वादही ओढवून घेतले आहेत. परंतु जेव्हा गोष्ट देशाची येते तेव्हा त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्यावर त्यावर सेहवागने आपले परखड मत व्यक्त केले आहे.

 

जम्मू-काश्मीरच्या पुँछ जिल्ह्यातील मेंढरमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय सैनिकांत गोळीबार झाला. ज्यात भारताचे दोन जवान शाहिद झाले. पाकिस्तानी जवानांकडून शाहिद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यावरच सेहवागने आपलं मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

 
रानटी लोकांना भारतीय जवानांच्या मृतदेहाची केलेली विटंबनेमुळे दुःख होत आहे. आपल्या शहिदांचा हे बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे. पाकिस्तानला मोठा डोस द्यायला हवा जर त्यांना छोटा चालत नसेल तर.