हरभजन सिंगला व्हायचं होत ट्रक ड्राइवर!

0 63

भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने काल आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. फिरकी गोलंदाज म्हणून मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेल्या या खेळाडूला कधी काळी ट्रकड्राइवर व्हायचं होत असं जर कुणी म्हटलं तर यावर विश्वास बसणार नाही.

परंतु हे खर आहे. याचा खुलासा खुद्द भज्जीचा एकवेळचा संघासहकारी असणाऱ्या सेहवागने केला आहे. काल भज्जीला ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात एक शुभेच्छांचा ट्विट वीरेंद्र सेहवागचाही होता.

सेहवाग म्हणतो, “आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी एकवेळ कॅनडाला जाऊन ट्रक ड्राइवर होण्याचा विचार ते एक महान गोलंदाज हा खरंच एक चांगला प्रवास आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भज्जी! ”

Comments
Loading...
%d bloggers like this: