सेहवागला करायचा या परदेशी खेळाडूबरोबर वाढदिवस साजरा

मुंबई । भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आज आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. सेहवागला यामुळे त्याचे माजी संघसहकारी, मित्र, चाहते आणि माजी खेळाडूंकडून खास शुभेच्छा येत आहेत.

सेहवागने आज सर्व दिग्गजांना शुभेच्छा दिल्याबद्दल लगेच आभार मानले आहे. परंतु आपल्या चाहत्यांनाही नाराज केले नाही. चाहत्यांसाठी सेहवागने आज एक खास प्रश्नोत्तरांचा सेशन घेतला. ज्यात #virudiwas हा हशटॅग वापरून प्रश्न विचारणाऱ्यांना वीरूने उत्तर दिली.

अमर नावाच्या एका चाहत्याने वीरूला खास प्रश्न केला की तुला जर एखाद्या परदेशी क्रिकेटर बरोबर वाढदिवस साजरा करायची संधी मिळाली तर कोणाबरोबर तुला तो साजरा करायला आवडेल?

क्षणाचाही विलंब न लावता वीरूने उत्तर दिले की फक्त आणि फक्त ख्रिस गेल.

 

विशेष म्हणजे आज सकाळीच ख्रिस गेलने सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

ख्रिस गेल आणि सेहवाग हे जागतिक क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज म्ह्णून ओळखले जातात.