सेहवागचा आज वाढदिवस, रहाणेने दिल्या सेहवाग स्टाइल शुभेच्छा !

मुंबई । आज भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा ३९वा वाढदिवस. वाढदिवस कुणाचाही असो सेहवागच्या हटके शुभेच्छांशिवाय तो पूर्ण होत नाही. परंतु आज सेहवागलाच आज आपला मराठी मुलगा अजिंक्य रहाणेने क्लीन बोल्ड केले आहे.

रहाणे आपल्या शुभेच्छांमध्ये म्हणतो, ” वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वीरू भाई. आम्हाला निर्भय या शब्दाचा अर्थ शिकवल्याबाबदल धन्यवाद. इच्छा होती की आपले त्रिशतक दुसऱ्या बाजूने पाहता यायला पाहिजे होत. “

यावर सेहवागनेही लगेच रिप्लाय देत अजिंक्यने मोठी कामगिरी इच्छा व्यक्त केली. सेहवाग म्हणतो, ” धन्यवाद अजिंक्य. मी तुला शुभेच्छा देतो आणि इच्छा व्यक्त करतो की तू त्रिशतक करशील आणि मी समालोचन कक्षातून पाहत असेल. “